नवीन लेखन...

बघून सूर्यपूजा पावन झालो

हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

निरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…

नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”. […]

खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  । पवित्रता भासे तेथे, बघता […]

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

बेताल आणि बेभान

सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही. […]

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १

भगवान शंकर आणि देवी पार्वती या अभिन्न शक्ती आहेत. या दोघांच्या एकत्रित स्वरूपाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. इतके त्यांचे एकरूपतत्व आहे. इतर वेळी देखील त्या दोघांचे एकत्रित वर्णन पहावयास मिळते. प्रस्तुत स्तोत्रात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या दोघांनाही एकत्रित वंदन करीत आहेत. […]

1 2 3 4 5 6 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..