ईश्वरी गुप्तधन
होता एक गरीब बिचारा । किडूक मिडूक ते जगण्या चारा ।। कौलारु जुनी पडवी निवारा । जन्म दरिद्री दिसे पसारा ।। परिस्थितीनें गेला गंजूनी । आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।। शरीर जर्जर झाले रोगांनी । जगण्याची आशा उरे न मनीं ।। अवचित घटना एके दिनीं । धन सापडे जमिनीतूनी ।। मोहरांचा तो होता रांजण […]