नवीन लेखन...

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद […]

गण्याच्या करामती

शिवापूर गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला.वळणा वळणाच्या रस्त्यानी वेढलेल्या या गांवचा सौंदर्य काय सांगायचा. मनोहर मनसंतोष गड, रांगणा गड या सारख्या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या छोटयाश्या गांवात गणेश नार्वेकर नांवाचो व्यक्ती रहायचो. घर तसा मातयेचाच. पण नळयांनी शाकारलेला. लोक आवडीन त्येका गणो नार्वेकार म्हणान ओळखत. घरात आवशी बापाशी सोबत गणो – हवा. […]

बायको माहेरी जाणे – एक दुःखद (सुखद) प्रसंग

प्रत्येक विवाहित पुरुषाच्या आयुष्यात बायको माहेरी जाणे असे आनंदाचे प्रसंग येतात. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी असा प्रसंग आला आणि तिला एकट्यालाच माहेरी जाणे आवश्यक असेल तर तशी (खुश) खबर बायकोच तुमचा मूड बघून अतिशय लाडीकपणे सांगते. काही वेळेस तुम्हाला देखील सोबत येण्याचे आग्रही निमंत्रण असते. तुम्हाला ऑफिसच्या कामातून सुटी मिळणे अशक्य असेल तर सूट मिळू शकते.  पण अशा वेळेस तुमच्या कौशल्याचा कस लागू शकतो. […]

निवृत्ती

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती. […]

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज

…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे. […]

शतकाचा साक्षीदार !

कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस! […]

कन्येस निराश बघून

कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]

वैश्विक अन्न दिन

आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. […]

उगवतीच्या कळा : ६

एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत. […]

1 5 6 7 8 9 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..