उगवतीच्या कळा : ४
तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले . […]