जीवन मरणाची शर्यत
शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली, हा विचार आला […]