श्रीगोविन्दाष्टकम् – मराठी स्वैर गद्य व पद्य अर्थासह
श्रीमद् शंकराचार्यांनी हे श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा उल्लेख करणारे रसाळ स्तोत्र आर्या वृत्तात रचले आहे. अनुप्रास अलंकाराने ते विशेष नटले आहे. त्यामुळे ते अतीव गेयही आहे. ते वाचताना काही ठिकाणी ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या संत नामदेवांच्या निर्गुणाचे सगुण रूप खुलवून सांगणा-या अभंगाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. फक्त त्यांचा बाळकृष्ण राजमंदिरात रांगतो, तर आचार्यांचा गोठ्यासमोरच्या पटांगणात ! […]