श्री भ्रमरांबाष्टकम्- ३
राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्। राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।। राजन्- शोभासंपन्न असलेली, मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस. मन्दगमनां – त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली. राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी. राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान […]