नवीन लेखन...

आकाशाशी स्पर्धा करणे

आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने ,फुले यांनी, खोडास सतत बिलगावे, झाड लेकुरवाळे असते, तरी किती निस्संग,—!!! एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,–!!! हिरवे […]

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।।   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।।   भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला  ।।३।।   देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]

श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ५

प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति। श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥ पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे. […]

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

 जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून  । मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता  । ढोबळतेचा विचार येता,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला  । गेला क्षण  परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई  ।। समाधान जे मिळे तुम्हाला, […]

श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ४

प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्‌।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्‌॥४॥ प्रातः स्तुवे – प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो. परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी. ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी. भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी. त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, […]

मित्रराज उगवताना

मित्रराज उगवताना, सृष्टीवर घडे करामत, आभाळ उतरे जळात, त्याचे रूप दिसे पाण्यात, आरस्पानी निळे सौंदर्य, नजरा खिळवून ठेवी, हलते डोलते आभाळ, पाण्यात प्रतिबिंबित होई, वृक्षांचे समूह किती, धरतीवर कोण पेरती, निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,–!! तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई, प्रकाशाचे किरण घेऊनी, दिनकराचा प्रवेश होई,-! अंधारी बुडालेली सृष्टी, रंग तिचा बदलून जाई, […]

कोरोना – मृत्यू वादळ

आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर    

नॉस्ट्रडेमसची भविष्यवाणी

नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]

1 102 103 104 105 106 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..