श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ३
प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्॥३॥ यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत. प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना. कशी आहेत ही चरणकमले? भक्तेष्टदाननिरतम् – भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे. यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले […]