रात्र सामोरी येतां
रात्र सामोरी येतां, मन कसे कोमेजते, मावळतां दिन सारा, काळोख घेऊनी येते, दिवसाचे तास संपती, असे बघतां-बघतां, स्मृतींच्या इंगळ्या डसती, *संधिप्रकाश* ओसरतां, काळजाचे धागे तुटतां, जिवां हुरहूर लागे,— फक्त “काहूर” तेवढे, मनांत होते जागे,–!! अंधाराची सोबत न्यारी, कुणां अश्रू ना दिसे, आपुल्याच,–रात्री वाटती,– कसे ऋण” फेडायाचे,? सुख–दु:खांचे,हिशोब सारे, नकळत आपुले मन मांडते, सरशी’ कुणाची होते हे, […]