बाहुली! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – ३
ते एक खेळण्याचे दुकान होते. काचेच्या शोकेस मध्ये खेळणी मांडून ठेवली होती. त्यात सुंदर बाहुल्या, लाकडी रंगीत घोडे, उंट, खेळातली भांडी अजून काहि काही गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. येणारी लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पहाण्यात रंगून जात.दुपारची वेळ होती. दुकानात गिऱ्हाईक नव्हते. मालकाने नौकरास जेवण करून घेण्यास सांगितले. त्याचे जेवण झाल्यावर, मालक जेवायला निघून गेला. […]