श्री कनकधारा स्तोत्रम् – ५
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।। बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती. मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु. विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. […]