नवीन लेखन...

प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.

माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते. […]

 पुजारी – पुरोहित

पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो  । भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग करूनी घेतो  ।।१ पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे । भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे  ।।२ व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति दाखविती । धर्माचे नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती  ।।३ पुरोहित असा असावा,  धर्माची करि उकलन । भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग  देयी […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – १२

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥ परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक. आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात, माता च पार्वती देवी- देवी पार्वती […]

ईश्वरी संकल्पना… उच्चशक्ती (बेवड्याची डायरी – भाग २०)

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे……. […]

भावयुक्त उपासनेला नियमित स्थान

आपल्या उत्पन्नाचा १०% भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन, ही सुखं दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत. सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देवोत हीच त्या जगताच्या पालन करत्या चरणी प्रार्थना करतो….. […]

प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – ११

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥ आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत. अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी […]

देवा…..

एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा, “देवा,या वर्षी फारच थंडी आहे ” “देवा,भयानक उन्हाळा आहे “देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला “अरे काय महागाई वाढली देवा ” “देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही ” देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला, “तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ???? तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – १०

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरीसाक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी । दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ १०॥ क्षत्रत्राणकरी- क्षत्र शब्दाचा एक अर्थ आहे संकट. त्यापासून त्राण म्हणजे संरक्षण करणारी. महाऽभयकरी- अभय अर्थात सर्व प्रकारच्या भीतीं पासून मुक्ती देणारी. सामान्य जीवनात सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. त्यालाच आपण त्राण म्हणजे संकट समजतो. आई जगदंबेच्या कृपेने ही […]

1 111 112 113 114 115 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..