श्री अन्नपूर्णाष्टकम् – ५
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी । श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥ आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात, दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात. […]