थेंब
जलबिंदू इवलासा आवडतो हा फारसा नभात तो दावतोना इंद्रधनू शोभतोना थेंबातूनी जाता तेज दिसतसे रंग शेज कधी दिसे मज मोती कधी वाटे हिरा किती पहाटेस दवबिंदू रुप घेई जलसिंधू हिमालयी हा गोठतो क्षणार्धात बर्फ होतो द्रव स्थिती वायू स्थिती थेंबा तुझी जलस्थिती — सौ.माणिक शुरजोशी नाशिक