नवीन लेखन...

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

‘अर्थ’ संकल्प 

१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे. अर्थाचे काय ? भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो. दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो. काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे एकापेक्षा जास्त अर्थ लावता येतात …. […]

कलंक ‘गुन्हेगारीचा’ झडो..!

…. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना निलंबित केले वा उमेदवारीच दिली नाही, किंव्हा जनतेने अशाना निवडूनच दिले नाही तर सुंठीवाचून खोकला जाईल. पण, ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात’ अशी मानसिकता सर्वांचीच झाली असेल तर राजकारणाला लागलेला गुन्हेगारीचा कलंक दूर होईल कसा? […]

निसर्ग आणि मन (चारोळी)

*निसर्ग* अद्भुत घटनांनी भरलेला कविंना वेडावून सोडणारा तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला या मानवाला गुढतेत ढकलणारा *मन* मन हे चपळ चपळ कधी इथे तर कधी तिथे मन हे उथळ उथळ कधी रडे तर कधी हसे सौ.माणिक शुरजोशी नाशिक

आनंद लुटणारे मन !

सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते.  […]

अरे माणसा माणसा

अरे माणसा माणसा ,नको असा अंत पाहू , जीवसृष्टी ज्यावर जगे, त्या निसर्गा नको तोडू ,–!!! अरे माणसा माणसा, जगू देत वल्ली तरु, प्राणांसाठी संजीवन असे, नको त्यास दुर्लक्षित करू,–!!! अरे माणसा माणसा, पाणियाला चल वाचवू , जलस्त्रोत जगातले सारे, वाया नको असे घालवू ,–!!! अरे माणसा माणसा, धरणीवर घाव नको घालू , काळी आई पिकवे […]

कळेना कसे जडले रे मन (गीत)

कळेना कसे जडले रे मन आज हरपले माझे रे भान।।धृ।। फुलात दिसतो,मनी हसतो क्षणात जीव उगाच फसतो मन अजुनही आहे रे सान आज हरपले माझे रे भान।।१।। घरात होतसे तुझाच भास दिलवरा श्वासात तुझी आस साद ऐकण्या आतुरले कान आज हरपले माझे रे भान।।२।। तळमळ वाढे उगाच जीवा हळहळ दाटे मनात प्रिया कंठात दाटूनी आले रे […]

मिशन फेल …! (नशायात्रा – भाग १९ )

मटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

1 121 122 123 124 125 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..