दुरावा
भारत भूच्या सीमेवरी लढण्या सैनिक असावा मनामध्ये नसावा कधी घरच्यांसाठी रे दुरावा देशाचे रक्षण करणे माझे हे कर्तव्य पहिले दुराव्यातही जवळीक ह्यातच हित रे आपुले भारत मातेचे शिपाई त्यांचे घरटे गावदेशी माता- पिता ,पत्नी-मुलांची बांधिलकी असे मनाशी नकोच खंत दुराव्याची नातीच अपुली प्रेमाची जाणीव देश रक्षणाची चिंता नाहीच दुराव्याची — सौ माणिक शुरजोशी नाशिक