एका कलाकाराची छबी
मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’. […]