मातृत्वाची कन्येस जाण
आई होवून कळले मजला, कष्ट आईचे आज खरे स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे….१ नवूमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देवूनी शक्ती बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती….२ देहावरी अघांत पडता, झेलूनी घेई सारे कांहीं बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही….३ संगोपन ते करिता करिता, हासत होती अर्धपोटी तू सूखी […]