श्रीकृष्णाचे जीवन : बनली एक गाथा
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२|| बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३|| मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी […]