नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ

….सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत ” […]

आठवण आईची

माझी जन्मदात्री होती अतिव सोशिक जणू एक पावन गंगोत्री //१// पहाटे उठावे आटपावे आन्हिके ही पाल्यांसाठी आदर्श जपावे//२// होती सुगरण कोंड्याचा मांडाही करी लेकरा मायेची पखरण //३// न दुर्मुखलेली सदाच होती हसरी नी अगत्यास आसुसलेली//४// जाता सोडूनिया ये आठवण आईची ना करमे तिला सोडूनिया//५// जाता अचानक हळहळ दाटे मनी स्वप्नी डोकाव ना क्षणएक//६// सौ.माणिक शुरजोशी नाशिक

प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)

एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण . […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।।   सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच आहेत […]

मी कविता का करते?

मी कविता का लिहिते मनाची कल्पकतेची धाव कागदापर्यंत पोहचते लखलखत्या लेखणीतून ती कागदावर उतरते कागदावरील कल्पक भाव हलकेच गुणगुणते त्यालाच तर कुणी काव्य म्हणते मग कल्पनेला आधिकच स्फुरण चढते म्हणून मी कविता लिहिते — सौ.माणिक शुरजोशी

विसरलास का श्रीरंगा

विसरलास का श्रीरंगा, गोकुळीच्या गोपिकांना, सोडून गोकुळां जाता, तुम्ही द्वारकाधीश होता,–!!! आठवतो बाळकृष्णा, तुझा हुडपणा आम्हा, बाळपणीचा काळ सुखाचा, येतो प्रत्यय जेव्हा तेव्हा,–!!! जो तो गेला भूतकाळा, काय घडते वर्तमाना, कुणाचा कोणास नाही पत्ता, विराण ही शांतता, खायला उठे गोकुळा,–!!! मौज, मस्ती करत दंगा, स्मरतो साऱ्या बालगोपाळा, दही-दूध-लोणी,पळवत होतां,– कोण रागे भरणार तुम्हां,–!!? कोण होई तक्रार […]

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करित करित लक्ष्य तयांचे फूलपाखरू,  फुलाभोवती होते खेळत….१ भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी शोषीत असता गंध फुलांतील,  चंचल होते नजर ठेवूनी….२ व्याघ्र मावशी मनी  ही राणी,  म्याँव म्याँव म्याँव करित आली उंदीर मामा दिसत तिजला,  झेप घेण्या टपून बसली…३ शंका येता त्याला किंचीत,  झर् झर् झर् तो बिळात […]

मराठी संस्कृती (मुक्तछंद)

महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे थोर किती घंटानाद आणि काकड आरतीने होते प्रभातीची सुरुवात नामस्मरणाने सडासारवण,सुबक रांगोळी छान दारी अगत्याचे झुले तोरण छान येता वासुदेव दारी पसाभर धान्य देती नारी जात्यावरच्या ओवीने आयुष्याचे वस्त्र विणले दारोदारी गुढी उभारूनी नववर्ष स्वागत घरोघरी झुलला पाळणा रामनवमीसी हनुमंताची जयंती अंजनेरीसी भांडले-तंटले परी व्रतवैकल्य केले वडपोर्णिमे सवे हरतालिका पुजन केले घरोघरी […]

1 133 134 135 136 137 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..