नवीन लेखन...

आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१, त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२, जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४९७९८५०  

जीवनाचा रणगाडा

‘मुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे  जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान  पेलून  सक्षम पणे  मार्गक्रमण  करण्याची  जिद्द  येथील  मनुष्याला  असते. […]

दान

दान मागावं मागावं दान भक्तीच मागावं। दान द्यावं ते द्यावं दान नेत्राचं द्यावं।। दान मागावं मागावं दान माणुसकीचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान रक्ताचं द्यावं।। दान मागावं मागावं दान प्रेमाचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान अर्थाचं द्यावं।। दान मागावं मागावं दान सन्मानाचं मागावं। दान द्यावं ते द्यावं दान वस्त्राचं द्यावं।। दान मागावं मागावं दान […]

अंतरपाट (लघुकथा)

अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं. कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती. […]

सय माहेराची (ओवीबद्ध रचना)

सय माहेराची येते मन झुलते झुलते क्षणात माहेरी जाते मी तिथेच रमते।।१।। आहे प्रेमाचे आगर तिथे मायेचा सागर घडे प्रितीचा जागर हा बंधू भगिनीत।।२।। हे केवड्याचे कणीस सुगंध रातराणीस बकुळ माळे वेणीस परसदार खास।।३।। मित्र मैत्रिणींचा मेळा जमतो ना वेळोवेळा झिम्मा फुगडीही खेळा हा मैत्रीचा सोहळा।।४।। आई माझी सुगरण करी पुरण वरण मिळे स्वादिष्ट भोजन अगत्याचे […]

श्री गणेश भुजंगस्तोत्रम्- भाग १

भगवान गणेशाचे हे स्तोत्र जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या वृत्तात रचले त्या नावानेच ते विख्यात झाले आहे. या स्तोत्राचे वृत्त आहे भुजंगप्रयात. भुजंग अर्थात सर्प. तो जात असताना ज्या प्रकारच्या वळणांचा उपयोग करतो तशी वळण घेत जाणारी ही शब्दावली. त्यामुळेच या वृत्ताला भुजंग प्रयात असे म्हणतात. […]

तू खरी, का मी

तू खरी, का मी, प्रश्नच मज पडे, कोण सुंदर जास्ती, कोडेच ते पडे,–? चिंतन करते, डोळे मिटुनी, का तसेच करते तीही,–? इतके साम्य दोघीतही, तरंग उठतात प्रत्यही,–!! काय निनादले अंतरंगी, जणू पावा वाजवे श्रीहरी, मंजूळ ती *धून ऐकुनी, तीही गेली भान विसरुनी,-! अद्वैतरुपे दोघीआम्ही , आत्मा एकच विचरी, संवाद साधत प्रतिबिंबी, म्हणू का माझीच सावली,-? कृष्णच […]

पोशिंदा

दिनरात कष्ट करी शेतामधे राबतो मी धनधान्य पिकवितो तुम्हा सर्वा पोसतो मी ।।१।। लोक म्हणती पोशिंदा उभ्या जगाला तारतो कष्ट दैवत बळीचे भार नित्य उचलतो ।।२।। खांद्यावरी लाकडाची मोळी माझी सखी झाली विकुनिया चार पैसे मिळताच सुखं आली ।।३।। घर्म धारा गळतात गालफडं बसतात डाव सारे फसतात कर्ज फार असतात ।।४।। नाही खंत मला त्याची फेडणार […]

बेवड्याची डायरी – भाग ४ – कर्कश्य बेल

टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ..टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ्र्र्र्र्र..कर्कश्य आवाजात तिसर्यांदा बेल वाजली तेव्हा मी वैतागून तोंडावरचे पांघरून काढले अन डोळे उघडले ….आसपास बहुतेक लोक उठलेले होते .मी भिंतीवरच्या घड्याळात पहिले सकाळचे साडेपाच झाले होते ..बापरे इतक्या लवकर उठायचे ? आसपासचे लोक उठून आपापल्या चादरी घडी करण्यात आणि गाद्या गुंडाळून ठेवण्यात गुंग झाले होते ..मी काल रात्री सुमारे आठ वाजता जो गोळ्या […]

कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

1 137 138 139 140 141 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..