तेजोनिधीच्या आगमनाने
तेजोनिधीच्या आगमनाने, सारे जागे झाले चराचर, सोनेरी लख्ख प्रकाशाने, उजळत जसे धरणीचे अंतर,— अंधाराच्या सीमा ओलांडत , रविराजाचे पहा येणे, उजेडाच्या सहस्रहस्ते, पृथेला हळुवार कुरवाळणे,–!!! झाडां-झाडांमधून तेज, खाली सृष्टीपर्यंत पोहोचे, अजूनही आहे निसर्गच श्रेष्ठ, मित्राचे त्या मूक सांगणे,–!!! किमया आपली न्यारी करे, अव्याहत ते चक्र चालते, ब्रम्हांडातील सारे खेळ हे, पृथ्वीवर सर्व देत दाखले,–!!! सूर्यकिरणांची तिरीप, […]