आई तू माझी जननी (चारोळी)
आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी
आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी
आम्हालाही मनातून व्यसन बंद करावे असे वाटत असे कधी कधी पण जमत नव्हते व तिघांची तिकडी इतकी पक्की होती की एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे , शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपण किमान ५ दिवस एकमेकांना भेटायचे नाही म्हणजे गांजा पिण्याधी आठवण होणार नाही व आपले व्यसन सुटेल झाले ठरले . […]
चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती ते चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक ते जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा, डोळे मिटतो दुजा […]
तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा, अविरत निष्काम सेवेला, दिनरात अंगिकारणारा, तू वाटतोस पावसासारखा, चिंब भिजवून टाकणारा, परिसरच काय, ओलेता, तनमनही धुवून काढणारा, तू असशी वाऱ्यासारखा, करारी, स्वयंभू विचरणारा, माहित नाही दिशा रस्ता, सरळ जाऊन थडकणारा, तू विस्तीर्ण समुद्रासारखा, अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा, तू झऱ्यागत नाचणारा , निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना, आनंद […]
खरा तो एकची धर्म जाणा सत्कर्मातले वर्म करा आपुलाले कर्म प्रेम करणे स्वधर्म…१ प्रेम करणे स्वधर्म त्यास निस्वार्थी झालर आदरार्थी परधर्म करा त्याचाही आदर सौ.माणिक शुरजोशी
लोकशाही सत्ता हवी लोकशाही राज्य भारताने स्विकारले लोकहो टिकवा हे सुराज्य इथे चालवतो पंच वार्षिक योजना नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो बेधुंद जनता हानीकारक देशास निर्बंधच फायदा असता हाव नको नुस्ती राजकारण्या खुर्चीची त्यास समाजसेवेची पुस्ती करू नका इथे जाळ-पोळ,दंगा-धोपा जिथे शांती लोकशाही तिथे कर्तव्य नी हक्क दिले ना संविधानाने पाळता होतील सारे थक्क सौ.माणिक शुरजोशी […]
त्या सर्व ब्रह्मांचे अधिपती, जे ब्रह्मणस्पती श्री गणेश ते गजेंद्ररुपिन् होत. अशा श्रीगणेशांचे मी भजन करतो. […]
काळजांचे गुंफीत धागे, प्रीत आपुली जडे, कृष्णावर राधा भाळे, गोकुळास किती वावडे,–!!! सोडून मी आले , सारे घरदार अन् बाळे, सोडला संसार सारा, प्रेम केले रांगडे,–!!! कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत, तन मन माझे अनावृत्त, अनयाला ही जणू सोडले, हरीशी जेव्हा झाले अद्वैत,–!!! मन, काळीज, अंतर, हृदय, सारे काही त्यास दिले, आता, नाही काही उरले, आत्म्याने आत्म्यास […]
बाल्यावस्था रम्य कसे रमतांना मौज असे सरतांना बालपण येई मना दडपण हा किशोर अवघडे कुतूहल मनी दडे नाना प्रश्न येता मनी ओथंबला तारुण्यानी तरुणाई मस्तीतली नवलाई धुंदीतली जिरे रग तरुणाची चाहुलही वार्धक्याची वार्धक्य हे विरक्तिचे अवलंबी निवृत्तीचे दुखे-खुपे भय साचे दुखण्याने वृद्ध खचे पुर्ती करा कर्तृत्वाच्या चारीवस्था महत्वाच्या सौ.माणिक शुरजोशी नाशिक
चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासाठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions