आत्मपूजा उपनिषद : ४ – ५ : उन्मनी भाव हेच जल आणि मनरहितता हाच अर्घ्य!
प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो. […]