फांदीवरती बसलो मी
फांदीवरती बसलो मी, पिसारा आपला जुळवुनी, बघतो साऱ्या सृष्टीला, एकवार पुन्हा निरखुनी,—!!! हिरव्यागार या रानी, मजला दिसे समृद्धी, जीवन इथेच रमुनी जाई, शांतता वाटे अंत:करणी,–!!! भाईबंदांच्या येतां आठवणी, मन जाते कसे हेलावुनी, कोण कुठल्या दिशेला नेला, निष्ठुर या माणसांनी,–!!! सौंदर्याचे जिवंत दाखले, कैद ते का असे करिती,–? आम्ही तर लेकरे निसर्गाची, मग शाप आमुचे भोगती,–!!! स्वातंत्र्याची […]