अमेरिकन गाठुडं – ५
आपल्या कडे कंपाउंड हे भक्कम विटा सिमिटाच्या भिंतीत असते. येथे बहुतेक कंपाउंड हा प्रकार नसतोच. असला तरी लाकडी फळकुटाचे असते, किंवा मग लोखंडी. आमच्या कम्युनिटीला लोखंडाचे आहे. संपूर्ण सेक्युरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हिसेसवर. कार गेटजवळ आली कि गेट उघडते. नाही उघडले तर गेटच्या पोलवरल्या पॅनलवर कोड नंबर प्रेस करावा लागतो. किंवा बहुतेकांच्या घराच्या किल्ल्या सोबत गेटचा रिमोट असतो. कोठेही सेक्युरिटी गार्ड नाही. […]