नवीन लेखन...

ओळख नर्मदेची – भाग सात

अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी   पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले   पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली   वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी   मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान […]

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय […]

आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता  `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली. […]

उगवतीच्या कळा : १

परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं? […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०

भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही. […]

आर. के. नारायण आणि मालगुडी डेज

१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. […]

ओळख नर्मदेची – भाग सहा

एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ४

आतापर्यंत आपल्या देशात असल्यामुळे कोणीतरी ओळखीचा मिळेल, अशी एक शक्यता होती. मात्र जिथे कोणीच ओळखीचा भेटणार नाही, अशा संपूर्ण अज्ञात, अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. कलकत्त्याहून बांगलादेशला न जाताच परत नागपूरला जाण्याची नामुष्की येते की काय? अशा परिस्थितीतून वैध परवाना मिळवून, अर्धी लढाई आपण जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला वाटत होता. […]

1 30 31 32 33 34 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..