नवीन लेखन...

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।   […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

बेताल आणि बेभान

सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही. […]

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १

भगवान शंकर आणि देवी पार्वती या अभिन्न शक्ती आहेत. या दोघांच्या एकत्रित स्वरूपाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. इतके त्यांचे एकरूपतत्व आहे. इतर वेळी देखील त्या दोघांचे एकत्रित वर्णन पहावयास मिळते. प्रस्तुत स्तोत्रात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या दोघांनाही एकत्रित वंदन करीत आहेत. […]

जपणुक भारतीय संस्कृतीची

अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली. […]

देवकी माता !

काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]

बंदची घुसमट आता पुरे !

एकीकडे सगळं काही खुलं केल्या जात असताना, अगदी सार्वजनिक कार्यक्रमांनाही मान्यता दिली जात असताना मंदिरांची कुलपे न उघडण्यामागे कोणतं तर्कशास्त्र असेल? हे लक्षात येत नाही. देवळे उघडण्यामागे लोकांची श्रद्धा हे कारण आहेच, परंतु यामागे भक्कम असे अर्थकारण देखील आहे. देवस्थानांच्या आधारे अक्षरश: लाखो कुटुंबे जगत असतात. हा निव्वळ श्रद्धेचा विषय नसून रोजीरोटीचा सवाल आहे. हे सरकारच्या लक्षात येत नसेल का? […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

जीवन चक्र

त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी  बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे. निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम  म्हणजे त्या कोळ्याच्या  ( Spider  च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल. […]

1 38 39 40 41 42 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..