नवीन लेखन...

द्वादशलिंग स्तोत्रम् – ३

आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा. […]

नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. […]

शिक्षक दिन

पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. […]

कृष्णजन्मी देवकीची खंत

भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – २

द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात. […]

सीएन टॉवर ….. एक आधुनिक आश्चर्य !

गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची ! […]

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,  फुलून येते ज्ञान वाहण्या…..३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तंत्रविश्व – भाग ६ : उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग शोधताना..

    कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या  पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर  मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – १

भगवान शंकर यांच्या नावाचा उल्लेख निघाल्या बरोबर प्रत्येक भक्ताच्या मनात येणारी प्रथम गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग. भारतीय संस्कृतीमधील महान उपास्य स्थाने असणाऱ्या या बारा स्थानांचे महत्त्व सांगणारे स्तोत्र आहे द्वादशलिंगस्तोत्र. […]

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

1 42 43 44 45 46 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..