तुला लाभलेली निसर्ग देणगी
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१ इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२ मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३ इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४ चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५ […]