देह – एक महान वस्ती
सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक । प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।। सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना । शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।। अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे ‘पुरूष’ । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे ‘ईश ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी […]