श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १
गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् | कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖ भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत. कसे आहेत हे भगवान गणेश? गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत […]