बालपणीचा काळ सुखाचा
‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते. […]