तगमग.. दारू.. तमाशा ! (नशायात्रा – भाग ३१)
जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता . […]