जपान वारी – प्रास्ताविक
आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन. […]