नवीन लेखन...

तेज

किरणात चमक ती असूनी, तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता, कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।   जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील, सर्व जनांना हेच सांगते ।।२।।   तेजामुळेंच वस्तू दिसती, विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।   डॉ. भगवान […]

आभाळाएवढा !

त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४१

या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]

रोजनिशी

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत. […]

पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय

2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’! […]

नदीवरील बांध

विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा   बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी   सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे   चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई   खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी   इच्छित दिशेने पाणी वाही     बांध घातल्यामुळे सारे जीवन प्रफुल्ल करीं        आनंदमय सगळे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०     […]

शंकर मुडके!

सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच. […]

काही माणसं ” अशीच ” असतात !

” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी. […]

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान […]

1 4 5 6 7 8 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..