रवि – उदयाचे स्वागत
उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे //धृ// उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१// स्वागत करुया रविउदयाचे रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]