नवीन लेखन...

प्रतिक्रिया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।।  १ फेकतां जोराने,  आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा,  होई तुमचे उरीं  ।।  २ शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील,  तुमचेच पाठीं  ।।  ३ प्रेमाने बोलणे,  सुंगध आणिते  । आनंदी लहरी,  मनां सुखावते  ।।  ४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तूम्हीं,  काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं  १   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे  २   उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले  ३   आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही […]

माणसांना उभे करणारे शब्द !

दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे. […]

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते  १   बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी  २   धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील […]

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता  ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।।   सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।।   दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।।   दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य […]

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // १   हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // २   परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // ३   जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या […]

भक्ष्य

नदिकाठच्या कपारीमध्ये,   बेडूक बसला दबा धरूनी उडणाऱ्या त्या माशी वरते,  लक्ष सारे केंद्रीत करूनी…१, नजीक येवूनी त्या माशीचे,  भक्ष त्याने करूनी टाकले परि दुर्दैव त्याचे बघा कसे,  सर्पानेही त्यास पकडले…२, बेडूक गिळूनी सर्प चालला,  हलके हलके वनामधूनी झेप मारूनी आकाशी नेले,   घारीने त्याला चोचित धरूनी…३, ‘भक्ष्य बनने’ दुजा करिता,   मृत्यूची ही चालते श्रृखंला जनक असता तोच […]

लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। १   मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।।  २   उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।।  ३   पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।।  ४   त्या असंख्यात चंद्रमा एकची […]

बाळाची भिती

खेळत होता बाळ अंगणीं    इकडूनी तिकडे मेघनृत्य ते बघत असतां    दृष्टी लागे नभाकडे उलटी सुलटी कशी पाऊले    घनांची पडत होती लय लागून हास्य चमकले     त्याच्या मुखावरती तोच अचानक गडगडाट झाला    एक नभांत दचकून गेले बाळ तत्क्षणी     होऊन भयभीत धावत जावून घरामध्यें    आईला बिलगले वाचविण्या त्या भीतीपासून     पदराखालीं दडले जरी थांबला गडगडाट    भीती कायम होती आवाजाचे नाद […]

1 2 3 4 5 6 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..