नवीन लेखन...

समाधानी वृत्ती

कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।   बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।।   ‘समाधान’ ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।।   सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी…१,   दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता…२,   वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३   शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला […]

सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात,   चालू असते सतत  ।। ज्ञानाची गंगोत्री वाहते,   पिणाऱ्यालाच ती मिळते  ।। प्रत्येक क्षण दयेचा,   टिपणारा ठरे नशिबाचा  ।। जलात राहूनी कोरडे,   म्हणावे त्यास काय वेडे  ।। फळे पडतां रोज पाही,   त्याची कुणा उमज न येई  ।। परि न्यूटन एक निघाला,   बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।। चहा किटलीचे झाकण हाले,   स्टिफनसनने इंजीन शोधले ।। जीवनातील […]

मच्छरांचे साम्राज्य 

जगावर राज्य कुणाचे ?  जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे  ? […]

कुकर…

आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात. […]

चिमणीची निद्रा मोड

चिंगी ‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३,   चिमणी – ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे […]

स्मृती-विस्मृती

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’. […]

प्रकाशात न आलेले सर्ग !

कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही. […]

1 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..