नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. […]

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]

दोन लाख सुनांची आई – कमलाबाई ओगले

कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।।   पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।।   जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।।   अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने […]

८ वी ड – भाग १५

अनेकजण सांगतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात […]

पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? (राघवाची गाथा)

राम : ( सीताहरण झाल्यानंतर रामांचा विलाप) – हे खग, मृग, हे तरुवर श्रेणी, हे अंबर अवनी पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? १ मम सीता सौंदर्यखनी ।। लावण्याची अनुपम मूर्ती फिके तिजपुढे कांचन, मोती पूर्णेंदूसम आभा वदनीं, घाली मज मोहिनी ।। २ जिला वराया धनू भंगलें जनकसुतेनें हृदय जिंकलें नभिंची ती दामिनी, जाहली रामाची […]

न संपणारा प्रवास…

आपण वेगवेगळ्या राज्यात जन्माला आलो तरी आपली मातृभूमी तर एकच आहे ना, एकाच मातृभूमीची आपण लेकरे आहोत मग हा परकेपणा का?? आपल्या देशातील नयनरम्य निसर्गाला टिपण्यासाठी विदेशातून लोकं इथे येतात मग आपण का आपली संस्कृती, निसर्ग सोडून बाहेरच्या देशात फिरायला जातो, त्यातच फक्त आपलं राज्य आणि आपली माणसं ही मानसिकता संपायला पाहिजे. आपला देश आपली माणसं अस व्हायला हवं तेव्हा कुठे आपल्यात एकता निर्माण होईल. […]

‘अर्धसत्य’ – व्यवस्थेची वैश्विक थुंकी !

अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो -हिरॉईनची, सोबतीला गुप्ते ,पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी ! आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही. […]

ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर

ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले. […]

मैत्र पत्रांचे – ४

माझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे. […]

1 3 4 5 6 7 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..