तिसवाडी
४५१ वर्षांत तिसवाडी म्हणजेच इल्हास म्हणजेच १५४३ पर्यंतचे गोवा यामधे काय घडले याबद्दल आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही म्हणून आपण विचारही करीत नाही. जे सांगितले गेले शिकविले गेले ते समजले, आता आपल चाललय ना व्यवस्थित मग सोडून देऊ अस आपण जगलो. पण आपल्या आक्रमक कर्त्यानी नोंदी लिहून ठेवल्या म्हणून काही गोष्टी आता आपल्याला जाणून घेता येतात. असल्या बऱ्याच नोंदी-गोष्टी नष्ट केल्या गेल्या हे ही जाणून घ्या. […]