MENU
नवीन लेखन...

‘बॉम्बे’ ते मुंबई – २६ वर्षे

४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]

साधना ताई आमटे आणि ‘समिधा’

आज ५ मे .. साधनाताईंचा ९५ व जयंती दिवस .. या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते.. […]

रविबिंबाला निरोप देण्या…

रविबिंबाला निरोप देण्या संध्या अवतरली त्याच वेळी त्या कवेत घेण्या, रजनी आतुरली II रजनी, उषा, अन संध्याराणी असती त्या भगिनी परी रवीवर प्रेम तिघींचे शुद्ध नी आरसपाणी रवीमिलनाला तिघींची ही त्या हृदये आतुर झाली त्याच वेळी त्या कवेत घेण्या रजनी आतुरली II गौरवर्ण ती उषा म्हणाली माझे स्थान पहीले ब्राह्ममुहूर्ती मलाच रवीने सर्व प्रथम पाहिले आमुच्या […]

‘शुक्र तारा’ जो संगीतातला

३० एप्रिल…..  ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! “सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा” हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका ! ” गोरी गोरी पान” ते “लळा जिव्हाळा शब्दच खोटे”, “या चिमण्यांनो परत फिरा रे” ते “ऊन असो वा असो सावली”, “चुकचुकली […]

इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू

( ही कविता प्राणवायुला समर्पित !) इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू । जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।। लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे । प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।। इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा । जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।। एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक । […]

तो….

जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची हळुवार शब्दांनी फुलवतो मने विकासाच्या फुलांना गंध देतो त्याला आयुधं लागत नाही – वन्ही पेटवायला ! तो अनादी आहे- अनंत आहे त्याच्यावाचून जग शक्य नाही तो कधी सांदीपनी होतो , कधी चाणक्य तर कधी अब्दुल कलाम आई तर तो कायम असतोच पण वडिलपणही अबोलपणे निभावतो ” […]

फुजिझुका (प्रति-फुजी)

जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी  वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात. […]

मजेमजेचे खेळ

आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . . […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

1 15 16 17 18 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..