सांगी’वांगी’
मराठी वाक्प्रचारामध्ये अनेक फळभाज्यांची नावं सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, पुराणातील वांगी पुराणातच, वांग्याचं तेल वड्याला, सांगीवांगी, इत्यादी. आमच्या शाळेतील एक शिक्षक फार कडक होते, ते गोंधळ घालणाऱ्या मुलांना दम देताना म्हणायचे, ‘तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी एकेकाच्या पार्श्वभागाचं भाजून सोललेलं भरताचं वांग करेन..’ असा दम ऐकल्यावर त्या मुलांच्या डोळ्यापुढे, कल्पनेनं त्यांचा पार्श्वभाग दिसायचा आणि ते ‘शांत’ बसायचे. […]