नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २)

… तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !…. विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !! […]

तृप्तीचे आभाळ

गुलमुसलेली सांज केशरी… गतआठवांचे थवे नभाळी… भावनांचे अंतरंग लाघवी… शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी… स्वरगंगेत नाहता भावप्रिती… गोधुलीची ही सांज आगळी.. मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी… प्रीतभारली तू कोमलकळी… सत्यप्रीती , हे दान भाळीचे… मकरंद , अमृती हा मधाळी… तृप्तीचे आभाळ अलौकिक… घुमते पावरी हरिची नभाळी.. सांजाळलेल्या केशरी उदरी.. उमलणारी प्रभात सोनसळी.. — वि.ग.सातपुते.(भावकवी) रचना क्र. 61 / ६ […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ८

माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला. मला पण … चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच. ************************** आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर… […]

सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच ! […]

बांगड्यांच्या काचा

आमच्या समोर ती नवीन नवरी म्हणून रहाण्यास आली असेल मी ८ ते १० वर्षाचा. त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते . आम्ही मुले-मुली खेळत असू. […]

गीत गाता चल !

आपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया  बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट ! […]

स्टॅम्प आजोबा

साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १)

योगायोगाने मला तर कै. आचार्य अत्रे यांच्याच रूमवर स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ३ दिवस त्यांच्या सोबत राहण्याच योग आला. अनेक दिग्गज म्हणजे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष बॅरिष्टर न. वि गाडगीळ, श्री. के. क्षीरसागर, राम शेवाळकर, ना. सी. फडके, अशा अनेक महारथी साहित्यिकांना पहाण्याचा आणी त्यांच्या सह्या घेण्याचा योग लाभला हे परमभाग्यच !!! […]

मनसंवेदना

जीवनामध्ये जेंव्हा जेंव्हा कधीही विश्रांतीसाठी… थोडसं हळूच पहुडावं…! एकांतात डोळे मिटावेट…. अन फक्त तूच दिसावीस….! असं सततच घडत असतं… प्रितीत अनावर ओढ़ असते…! हेच मात्र खरं ….!! तू जरी असलीस दूरदूर…! तरीही तुझा स्पर्शभास जाणवतो … मनांतरांची मुक्तमुग्ध भेट होते ….! खरच किति विलक्षण असते निर्मल सत्यप्रितीची ओढ… अनाहत , अलवार , ध्यास, भास, मानसस्पर्श , […]

1 3 4 5 6 7 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..