२२ मे.. ‘ ती ‘ चा वाढदिवस..
तिला मी पहिल्यांदा माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले, चार चौघीसारखी ती , कुठे काम करते , काय करते त्यावेळी माहित नव्हते. आमच्या घरच्यांना माहीत होते. […]
तिला मी पहिल्यांदा माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले, चार चौघीसारखी ती , कुठे काम करते , काय करते त्यावेळी माहित नव्हते. आमच्या घरच्यांना माहीत होते. […]
माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह ! […]
‘आवाज कि दुनिया के दोस्तो’…हा आवाज आमच्या पिढीने रेडिओ सिलोन वर अनेक वेळा ऐकला आहे तो आवाज. […]
घर, देता का कुणी घर…असं अप्पा बेलवलकरांना ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगतामध्ये बोलावं लागलं…मात्र चहा, देता का? असं अजून तरी कुणालाही म्हणायची वेळ आलेली नाही…. न मागता हजर असतो, तो चहा!! सकाळच्या पहिल्या चहा पासून संध्याकाळपर्यंत त्याची अनेकदा आवर्तनं होतातच. […]
उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार. […]
हिरवी हिरवी रानं….निळं निळं आकाश…लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू …उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी… झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी…. निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. […]
प्रथम तिज पहाता अग्नी मनी चेतला , झालो बेधुंद मी अंतरी वणवा पेटला ! आर्त नजर तिची मन घायाळ करून गेली एकमेकात गुंतलो आम्ही …. मनोदेवता सांगून गेली ! खट्याळ चमक तिच्या नेत्री स्वर्ग सुख पाझरले गात्री त्या क्षणी गेलो हरवून ती माझी,मी तिचा बनून ! होऊनी एकाकी जेंव्हा .. मोजतो अंधारी तारे , अलगद चाहुलीने तिच्या फुटती नवे धुमारे ! जेंव्हा दुखी बुडे आकंठ उरे जीवनी नुसती खंत पुरे तिची चाहूल आगळी जीवनी येई नवी झळाळी ! क्षणो क्षणी वाटत राही तिच्यात मी सहचरी पाही झाले दूर सगळे अज्ञान जुळता, तिचे मन माझे मन ! © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८० आपल्या अभिप्रायाचे स्वागत. आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.
आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ” […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions