June 2021
वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी
मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले. […]
साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)
व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत. […]
आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव
नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता. […]
कलियुगी संस्कृती
पांघरुनी , बेगडी मुखवटे.. सुन्न जगावे ! सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती..।।१।। कोण भला अन कोण बुरा ?.. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।। नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती.. टांगलेल्या , आता वेशीवरती.. आज निर्लज्यांची सदैव सद्दी.. स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।। कलियुगाचीच , सारी किमया.. […]
वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती
आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का? […]
कोंडमारा
बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे फिकाफिकासा … उदासवाणा… मलूल आहे असा बिचारा… अजून चाफा अबोल आहे… अजूनही दु:खं आत आहे खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे […]
जागतिक दृष्टीदान दिवस – १० जून
अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. […]
‘हाय’ आणि ‘बाय’ च्या मधील ‘फिर जिंदगी’
२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे. […]