भावनांचे इंद्रधनू
तू प्राजक्ती सुंदरा मधुगंधा मनमोहिनी.. तू सुवर्णकांती कोमलांगी कमलिनी..।। तू दवबिंदू सुपर्णी अंतरी ओघळणारी नाजूका चंदनगंधी मनांतरी गंधाळणारी..।। तू गुलमुशी बिंब कोवळे हृदयांतरा दीपविणारे तू भावनांचे इंद्रधनू आसमंता कवटाळणारे..।। तू मस्त पवन गंधधुंदला अलवार जातेस स्पर्शूनी प्रीत ! शीतल शिडकावा तृप्त सुखदानंद जीवनी..।। केतकीच्या बनात प्रीती स्वर्गानंदी मंतरलेली अनावर अधीर लोचने तव रूपात हरविलेली.।। मूक मुग्ध […]