सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ केविन वॉर्वीक
केविन वॉर्वींक याला मी भेटलो आहे त्याचे लेक्चर ऐकले असून एक भन्नाट शास्त्रज्ञ असून माणसापेक्षा यंत्र श्रेष्ठ आहे असे म्हणतो… त्याने काय शोध लावले ते जरा वाचा, वाटल्यास गुगलवर सर्च करून बघा.. समोरच थोडासा साधा पटकन मिसळणारा केवीन वोर्विक उभा होता. आत्ता तो 65 वर्षाचा आहे , मी त्याला भेटलो तेव्हा तो पन्नाशीचा असावा पण कुठलेही अवडंबर न माजवता तो गप्पा मारू लागला. तो ठामपणे म्हणत होता माणसापेक्षा मशीन श्रेष्ठच आहे आम्हा मानवतावादी लोकांना निश्चित ते खटकणारे होते. पण तो कुणाचीच पर्वा करता तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. […]