गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १०
ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता. […]